(Marathi) Ur-fascism

उंबेर्तो इको आणि ur-fascism (व्यवच्छेदक फॅसिझम)

इटलीचे प्रसिद्ध लेखक, उंबेर्तो इको, हे त्यांच्या मध्ययुगीन रहस्यकथांसाठी ओळखले जातात. पण मुळात ते प्राध्यापक. युनिव्हर्सिटी ऑफ बोलोंगा इथे सिमियॉटिकस् अशा एका काहीश्या obscure विषयाचे अभ्यासक आणि प्राध्यापक म्हणून त्यांची बहुतांशी कारकीर्द झाली, आणि त्यांचे बरेच लिखाण खरे तर त्याच विषयावर आहे. त्यांची “फोकालट्स पेन्डूलम” किंवा “द नेम ऑफ द रोझ” अशी गाजलेली पुस्तकेही एका अर्थाने सिमियॉटिकस् वर आधारित. 

तर हे सिमियॉटिकस् म्हणजे नेमेके काय? मराठी मध्ये खरे तर मला शब्द नाही सापडला. पण आपण त्याला प्रतीकांचे किंवा चिन्हांचे विज्ञान म्हणूया. किंवा अभ्यास. 

उंबेर्तो इको जन्माला आले तेंव्हा इटली मध्ये फॅसिझम (परत याला एक शब्द नाही मराठी मध्ये: आक्रमक राष्ट्रवाद, हुकूमशाही, अधिकारवाद, वगैरे सगळंच आले यात) फोफावत होता. त्यांनी तो खूप जवळून बघितला. बऱ्याच नंतर त्यांनी या विषयावर एक लेख लिहिला: “ur-fascism”. अर्थात – “व्यवच्छेदक फॅसिझम”. मला वाटते की हा लेखपण इको यांच्या सिमियॉटिकस्च्या अभ्यासातून आलेला असावा. कारण इथे प्रा. इको हे फॅसिझमची १४ लक्षणे किंवा खरे तर चिन्हे देतात, जेणेकरून ज्यांना फॅसिझमच्या इतिहासाची फारशी माहिती नाही त्यांनाही फॅसिझमची एक आगाऊ सावध लागावी. हा लेख मराठी मध्ये प्रसिद्ध झाला का हे मला माहीत नाही. पण आपल्या देशात आजकाल जे काही चालू आहे, ते बघता, हा लेख प्रत्येक भारतीय भाषे मध्ये भाषांतरीत करून व्हाट्सअप वर तरी किंबहुना पसरवला पाहिजे, असे माझे वैयक्तिक (आणि अल्पसंख्याकं) मत आहे. त्यासाठीच हा प्रयास. 

तर ही कोणती चिन्हे आहेत फॅसिझमची प्रो. इको यांच्या मते?

१. परंपरावाद / परंपरेची पूजा: “प्रत्येक फॅसिस्ट चळवळीमध्ये परंपरावादी लेखक कायम अग्रेसर असतात”

२. आधुनिकतावादाचा बहिष्कार: “आधुनिकतावाद (आणि युरोपिअन enlightenment) हा एक तर्हेची ऱ्हासाची सुरुवात मानली जाणे. प्रत्येक फॅसिस्ट चळवळ ही तर्कवादाच्या विरुद्ध असते आणि व्यवच्छेदक फॅसिझम म्हणजे अतर्क्यवाद असे म्हणणे चुकीचे नाही होणार.”

३. काहीतरी करण्यासाठी करणे: “सिद्धांतवादाचे खोडीकरण कसे करणार? तर कार्य — मग ते काहीही असो, कसेही असो, त्याचा विचारही ना करता  — कसे श्रेष्ठ, आणि सुंदर असा गैरप्रचार, आणि अर्थात ‘विचार कसे नपुंसक’ अशी त्याची दुसरी बाजू आलीच”

४. मतभेद म्हणजे देशद्रोह: “सारासार विचार म्हणजे फरक करता येणे, आणि फरक करता येणे हे एक तर्हेने आधुनिकतावादाचे प्रतीक. आधुनिक समाजात शास्त्रज्ञ समुदाय हा कायम मतभेदांकडे ज्ञान वाढवण्याचा मार्ग म्हणून सकारात्मकतेने बघतो. फॅसिस्ट्स आणि आधुनिकतावाद यांचा एकंदरीतच ३६ चा आकडा असतो.”

५. विविधतेची भीती: “फॅसिस्ट किंवा अगदीच नवं-फॅसिस्ट चळवळ सगळ्यात आधी ‘बाहेरच्यांच्या’ विरोधी आवाहन चालू करते. आपण विरुद्ध ते. व्यवच्छेदक फॅसिझम हे अगदी मुळापासूनच भेदभावी आहे (रंगभेद, जातीभेद, धर्मभेद)”

६. सामाजिक नैराश्याला आवाहन: “ऐतिहासिक फॅसिझम चे एक अगदी खास वैशिष्ट म्हणजे मध्यमवर्गीयांच्या नैराश्याचा वापर – त्या वर्गाच्या आर्थिक संकटाचा, किंवा राजकीय अवहेलनाचा, आणि ‘खालील’ समाजाच्या दबावाच्या भितीचा फायदा घेणे”

७. राजकीय कटाच्या कल्पनेने पछाडलेले असणे: “व्यवच्छेदक फॅसिझमच्या मानशास्त्राच्या मुळाशी एक ‘राजकीय कटाचे’ obsession असते. त्यात पण ‘आंतरराष्ट्रीय कट’. व्यवच्छेदक फॅसिझमच्या समर्थनकांमध्ये कायम एक तर्हेचा ‘वेढले गेल्याची’ भावना रुजवलेली असावी लागते.”

८. शत्रू हा ताकतवर आणि कमकुवत दोन्ही असतो: “प्रभावी वक्तृत्वाचा वापर करून लोकांचे लक्ष बदलवत राहून, शत्रू कधी खूप ताकतवर असतो तर कधी खूप कमकुवत!”

९. शांततावाद म्हणजे शत्रू बरोबर तह/करार: “व्यवच्छेदक फॅसिझममध्ये आयुश्यात संघर्ष नसून संघर्ष हेच आयुष्य असते”

१०. कमजोर लोकांचा तिरस्कार: “कुठल्याही प्रतिगामी चळवळीमध्ये एक तर्हेने  उच्चभ्रूंचे महत्वाचे स्थान असते”

११. प्रत्येक व्यक्तीला वीर बनवण्यासाठी प्रशिक्षण: “व्यवच्छेदक फॅसिझममध्ये वीरत्व हे प्रमाण असते. आणि विरत्व म्हणजे इथे बलिदान. मरणपंत”

१२. पौरुषत्व आणि शस्त्रपूजा: “पौरुषत्व म्हणजे स्त्रियांना खाली लेखणे, कुठल्याही चाकोरीबाहेरील लैंगिक क्रिया/सवयी/अभिव्यक्तीबद्दल असहिष्णुता आणि त्यांचा जाहीर धिक्कार — मग ती समलैंगिकता असो किंवा अविवाहीत राहणे असो”

१३.  निवडक पॉप्युलिसम: “आपल्या भविष्यात काही निवडक लोकांच्या भावनिक प्रतिक्रिया दूरदर्शन किंवा इंटरनेट या माध्यमातून ‘प्रातिनिधिक’ बनवल्या जातील, आणि ‘लोकप्रिय’ ठरवल्या जातील.”

१४. व्यवच्छेदक फॅसिझम शासकीय, संदिग्ध भाषेत संवाद साधते: “नाझी/फॅसिस्ट शालेय पुस्तकांमध्ये कायम अतिशय संकुचित शब्दकोश, मर्यादित आणि अगदी बाळभोध भाषाशैली वापरली गेली आहे, जेणेकरून मुले चिकित्सामक विचार करायला शिकू नयेत”

प्रा. इको यांनी हा लेख १९९५ मध्ये लिहिला. त्यामुळे “भारत विरोधी” असा (मुद्दा नं ४) यावर थेट आरोप तरी नाही करता येणार. आता या १४ लक्षणांतील किती तुम्हाला सध्या दिसत आहे हा तुमच्या वैयक्तिक अनुभव आणि वाचनाचा भाग. पण व्यवच्छेदक फॅसिझमच्या खुणा म्हणा किंवा लक्षणे म्हणा, किंवा अगदी प्रतीके म्हणा, प्रा. इको ह्यांचा हा प्रांत — शेवटी ते एक सिमियॉटिकस् या क्षेत्रातील दिग्गज. त्या खुणांकडे बघायचे की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्ण. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून फॅसिझमचे येणे लांबणार मुळीच नाही, किंवा आलेले फॅसिझम थांबणार मुळीच नाही. उलटे त्याला खतपाणीच मिळेल. आणि त्याला जो तो वैयक्तिक रित्या वेगवेगळ्या पातळीवर जबाबदार असेल. इतकंच झालं! 

माझे मराठी आता इतकेही चांगले नाही आहे. पण हा माझा प्रयत्न. तुम्हाला इंग्रजी मध्ये वाचायचे असेल तर मग हा पूर्ण लेखच वाचा: 

किंवा मग openculture  वरील हे सार वाचा — ज्याचा मी भाषांतरासाठी वापर केला आहे. 

आणि आवडले, किंवा महत्वाचे वाटले, तर करा फॉरवर्ड व्हाट्सऍप वरती. 

Leave a comment